आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे - प्रतिभा संगमनेरे अभिनंदनीय ::- सभासदांना आठ टक्के लाभांशासह सहा लाखांचे विमा कवच, संस्थेची बिनविरोध निवडणूक आणि अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी !
आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे - प्रतिभा संगमनेरे अभिनंदनीय ::- सभासदांना आठ टक्के लाभांशासह सहा लाखांचे विमा कवच, संस्थेची बिनविरोध निवडणूक आणि अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी ! ***************************************
नाशिक::- नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सभासद पाल्य विद्यार्थी गुणगौरव, सेवानिवृत्त सभासद सन्मान सोहळा व नुतन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा श्रीमती प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली व रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक तसेच डॉ.राजेंद्र बागुल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने सेवा निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा उपस्थित मान्यवर यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की आरोग्य कर्मचारी पतसंस्था थोड्या अवधीतच ९६५ च्या पुढे सभासद करुन स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत होऊन संस्थेचे दहा कोटीच्या पुढे भागभांडवल झाले आहे ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने पतसंस्था पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध करुन संचालक मंडळाने वर्गणी रुपात निधी जमा करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी केली ही अभिनंदनीय बाब असल्याने संपूर्ण संचालक मंडळ अभिनंदनास पात्र असल्याचे नमुद केले.
प्रमुख अतिथी म्हणुन मनोगत व्यक्त करतांना रवींद्र परदेशी यांनी नमूद केले की शासकीय आरोग्य कर्मचारी यांच्यामुळेच मला कोरोना काळात जीवदान मिळाले आहे. कारण माझ्यासह माझे कुटुंब कोरोना बाधीत झाले तेव्हा सर्व शासकीय आरोग्य यंत्रणेने मला योग्य उपचार व धीर देऊन कोरोनाची भीती दुर करण्याचे काम केले आहे. कोरोना साथरोग काळात ग्रामीण भागातील जनतेस याच आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून एक- एक महिना दूर राहुन खरे कोरोना योद्धा म्हणुन जनतेची सेवा केली त्याबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉ.राजेंद्र बागुल म्हणाले की,पतसंस्था सभासदांना दहा लक्ष रुपये तात्काळ कर्ज व रुपये सहा लक्ष विमा सुरक्षा कवच योजना प्रभावीपणे राबवत आहेत ही अभिनंदनीय बाब असल्याचे नमुद केले. महेंद्र जाधव सारखे तरुण आदिवासी दुर्गम भागातुन येऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस प्रशासन सेवेत कार्यरत होत आहे हे आरोग्य कर्मचारी यांचा पाल्य म्हणुन निश्चितच अभिमान असल्याचे नमुद केले.
सभासद पाल्य कुमार महेंद्र जाधव याने त्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परिक्षेद्वारे त्याची पोलीस निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल आरोग्य पतसंस्थेने सन्मान केल्याबद्दल कुटुंबातील घटकांचे आशीर्वाद मिळत असल्याचे नमूद केले. प्रस्तुत मिळालेले यशाचे श्रेय त्याने आपल्या कुटुंबातील घटकासह त्याच्या आईला देत असल्याचे नमूद केले.
सेवानिवृत्त सभासद फैय्याज खान यांनी मनोगत व्यक्त करतांना आरोग्य पतसंस्था सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान करुन त्यांच्या शासकीय सेवेचा गौरव करत आहात हे आनंददायी असल्याचे नमूद केले. नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्त सभासद यांच्या सभेस व्हॉईस चेअरमन अबु शेख, सचिव एकनाथ वाणी, संचालक जी.पी.खैरनार, मधुकर आढाव, प्रशांत रोकडे, संजय पगार, श्रीकांत अहिरे, तुषार पगारे, सुलोचना भामरे, सोनाली तुसे, मनोज महाले, राजेंद्र सोनवणे, वर्षा सपकाळे नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे चेअरमन रविंद्र आंधळे, माजी चेअरमन तथा संचालक बाळासाहेब ठाकरे, अमोल बागुल, सचिन अत्रे, किशोर अहिरे, यांचेसह जेष्ठ सभासद सुभाष कंकरेज, संजय संवत्सरकर, रुपेश पहाडी, बाळासाहेब चौधरी, राजेश शिरसाठ, दिनेश ठाकरे, महेंद्र गांगुर्डे, प्रतीक सोनवणे, प्रशांत सोनवणे, सुरेश जाधव, सुदेश इनामके, प्रमोद घरटे, शरद घरटे, अनिल तिडके, अनिल भामरे, उमेश अग्रवाल, धनराज ठाकरे, क्षमा ईचम, दिनेश शेवाळे यांनी सभेतील चर्चेत भाग घेऊन आपला सहभाग नोंदविला.
सभेचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन विजय देवरे यांनी केले तर संस्थापक चेअरमन तथा मुख्य प्रवर्तक जी.पी.खैरनार, संचालक मधुकर आढाव, सोनाली तुसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे उपाध्यक्ष अबु शेख यांनी केले तर वार्षिक सर्वसाधारण सभेस व गुणगौरव कार्यक्रमास उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे सचिव एकनाथ वाणी यांनी मानले.
*****************************************
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक ही संस्था आपल्या सभासदांना जमा शेअर्स रकमेवर आठ टक्के नफा वाटणी जाहीर करत आहे. नफा वाटणी सोबत आरोग्य कर्मचारी विमा कवच माध्यमातुन सभासदांचे आकस्मित निधन झाल्यास त्याच्या वारसास १ एप्रिल, २०२४ पासुन सहा लक्ष पर्यंत विमा संरक्षण देण्यात येत आहे.-विजय देवरे, चेअरमन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा