सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

     नासिक::- सामान्य प्रशासन विभाग जळगाव येथील वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे ( वर्ग ३ ) यांस १,८०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          तक्रारदार हे लोकसेवक असुन तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे २,००,०००/- रू.मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे दि. २१ रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचासमक्ष  तडजोडअंती १,८०,०००/- रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!