सालाबादप्रमाणे ओम् साई वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न !

सालाबादप्रमाणे ओम् साई वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न !

नासिक::- ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड डिझॅबल्ड या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ११ ऑगस्ट २०२४ रोजी नाशिक येथील मविप्र संस्थेच्या समाज कार्य महाविद्यालयात नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार येथून आलेल्या इयत्ता १०वी, १२वी व पदवी उत्तीर्ण अंध (दिव्यांग) विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक इंडस्ट्रिअल पर्सनल मॅनेजर या संस्थेचे पदाधिकारी राजाराम कासार, राजेंद्र आचारी, प्रकाश गुंजाळ व केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपत काळे सर उपस्थित होते. प्रारंभी अंधांचे कुलदैवत लुई ब्रेल व डॉ. हेलेन केलर यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष विकास शेजवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेचा परिचय करुन दिला. त्यानंतर पाहुण्यांचे मनोगते झाले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना राजाराम कासार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आपण सदैव संस्थेसोबत आहोत असे सांगितले व औद्योगिक क्षेत्रामार्फत संस्थेच्या उपक्रमांसाठी निधी प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले. तर डॉ. संपत काळे यांनी केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू व या संस्थेस जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करू असे सांगून संस्थेच्या कार्याची स्तुती केली. त्या नंतर उपस्थित ६० अंध विद्यार्थ्यांना रोख रक्कम, भेटवस्तू व पांढरी काठी देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ओम साई संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सचिव नारायण क्षीरसागर या दोघांच्या वाढदिसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. शेवटी संस्थचे उपाध्यक्ष डी. एन. महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले तर महासचिव रामदास जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सचिव नारायण क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य  कृष्णकुमार चावरे, विद्या जगताप, निमिता शेजवळ यांनी उपस्थिती दर्शवली व शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,