‘जेएनपीए’ कडून मविप्रला ३८ लाखांचे अर्थसहाय्य..!

‘जेएनपीए’ कडून मविप्रला ३८ लाखांचे अर्थसहाय्य..!


नाशिक : जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (जेएनपीए) यांच्यातर्फे नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला आर्थिक बळ देण्यात आले आहे. सीएसआर निधीतून मविप्र संस्थेला नुकताच ३८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.

जेएनपीएच्या अधिकारी वर्गाकडून मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. मविप्र संस्थेच्या पाच शाळांमधील मुलींच्या प्रसाधनगृहांच्या दुरुस्ती करण्यासाठी ‘जेएनपीए’ तर्फे सामाजिक दायित्व निधीतून ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा संभाव्य धोका टळण्यास मदत होणार आहे. मविप्र आणि जेएनपीए यांच्यातील करारामुळे संस्थेचे काम अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मदत होणार असल्याचे यावेळी 'मविप्र'चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. जेएनपीएचे संचालक उन्मेष वाघ हे मविप्र संस्थेच्या सटाणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, संस्थेबद्दलची आत्मीयता आणि सामाजिक दायित्व म्हणून मदतनिधीसाठी वाघ यांनी प्रयत्न केल्याचेही ॲड. ठाकरे यांनी सांगितले.


याप्रसंगी जेएनपीएचे संचालक उन्मेष वाघ, जेएनपीएच्या प्रशासकीय सरव्यवस्थापक मनीषा जाधवअध्यक्ष सुबोध आव्हाडसीएसआर सल्लागार सिद्धार्थ उघाडे यांच्यासह मविप्र संस्थेचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उपस्थित होते.

संस्थेला आर्थिक बळ दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकलेसभापती बाळासाहेब क्षीरसागरउपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगलचिटणीस दिलीप दळवी, सर्व संचालक व मान्यवर यांनी ‘जेएनपीए’सह सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल