किरण डोंगरदिवे साहित्य अकादमीच्या विचारपीठावर !
किरण डोंगरदिवे साहित्य अकादमीच्या विचारपीठावर !
मेहकर (दि ७ ऑगस्ट)::- मेहकरचे सुप्रसिद्ध साहित्यिक किरण शिवहर डोंगरदिवे हे आपल्या आशयघन आणि वैविध्यपूर्ण साहित्यासाठी ओळखले जातात. समीक्षणाच्या दालनात त्यांनी केलेले भरीव कार्य काव्यप्रदेशातील स्त्री, कविता आली सामोरी, समकालीन साहित्यावलोकन या ग्रंथाशिवाय साहित्यातील शिक्षण अशा स्तंभ लेखनातून महाराष्ट्रभर पोहोचले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय साहित्य अकादमी तर्फे क. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय विद्याविहार मुंबई येथे दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी होऊ घातलेल्या परिसंवादात शांता शेळके व्यक्ती आणि साहित्य ह्या परिसंवादात शांता शेळके ह्यांचे अनुवादकार्य ह्या विषयावर भाष्य करण्यासाठी निमंत्रित केले असून ह्या परिसंवाद सत्राचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक अशोक बागवे हे असून ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पानिपतकार विश्वास पाटील, उद्घाटक म्हणून प्रवीण दवणे, ह्यांच्यासह साहित्य अकादमीचे सचिव के श्रीनिवासराव, साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारी सदस्य प्रा. नरेंद्र पाठक ह्यांच्यासह मुंबई साहित्य अकादमीचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर, ह्यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील साहित्यिकाला साहित्य अकादमीच्या ह्या महत्वपूर्ण परिसंवादामध्ये निमंत्रित केल्या गेल्यामुळे जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील अभ्यास आणि चिंतनप्रचुरता ह्यांची नोंद केंद्र स्तरावर घेतली जात असल्याने जिल्ह्यातील साहित्याचा आलेख आणखी वर जात आहे. साहित्य अकादमीच्या मंचावर जिल्ह्यातील कवींच्या कविता ह्यापूर्वी सादर झाल्या असल्या तरी परिसंवादात जिल्ह्यातील साहित्यिकाला पहिल्यांदा संधी मिळाली आहे. किरण डोंगरदिवे ह्यांच्या चिंतनशील आणि अभ्यासपूर्ण व्यासंगाची साहित्य अकादमी कडून घेतलेली ही दखल जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रासाठी अभिमानस्पद आहे. या मुळे केंद्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरण डोंगरदिवे ह्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा