शेतकऱ्यांना मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना.

जिल्हा परिषद सेस योजना सन २०२४-२५ अंतर्गत ५०% किंवा मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना. 
              जिल्हयातील शेतक-यांनी पंचायत समिती येथे वेळेत अर्ज देणेबाबत आवाहन - श्रीमती माधुरी गायकवाड,
 कृषी विकास अधिकारी जि.प.नाशिक  
     
      नासिक::- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्हा परिषद सेस योजना सन २०२४-२५ अंतर्गत ५०% किंवा मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. लाभार्थी निवडीसाठी तालुकास्तरावर लॉटरी काढण्यात येणार आहे. सदर योजनेबाबतचे बाब निहाय निकष खालील प्रमाणे आहे. 

१). ट्रॅक्टर:-  सदरची योजना ०८-७० पी.टी.ओ.एच.पी.पर्यंत सर्व ट्रॅक्टरसाठी लागू असेल. ट्रॅक्टर हे BIS/ISI केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या संस्थेव्दारे प्रमाणित असावे. ट्रॅक्टरच्या उत्पादकाचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक राहील. महत्तम अनुदानाची मर्यादा अनु.जाती, अनु. जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभार्थींना खरेदी किमतीच्या ५०% किंवा रुपये १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर लाभार्थींना किमतीच्या ४०% किंवा रुपये १.०० लाख यापैकी कमी असेल ते प्रति नग देय राहील.
२). रोटॅव्हेटर-  ट्रॅक्टर (२० बी.एच.पी. पेक्षा जास्त) चलित औजारे- BIS/ISI केंद्र शासनाने ठरवुन दिलेल्या संस्थेव्दारे प्रमाणित असावे. महत्तम अनुदानाची मर्यादा खरेदी किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त मर्यादीत अनुदान रुपये २८०००/- प्रती नग देय राहील.
३). कडबाकुटटी यंत्र:-(इंजिन/ इलेक्ट्रीक मोटार चलीत ३ एच.पी पर्यंत व पॉवरटीलर आणि ट्रॅक्टरचलीत २० बी. एच.पी.पेक्षा कमी)- BIS/ISI केंद्र शासनाने ठरवुन दिलेल्या संस्थेव्दारे प्रमाणित असावे. महत्तम अनुदानाची मर्यादा खरेदी किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त मर्यादीत अनुदान रुपये १६०००/- प्रती नग देय राहील.
४). विदयुत पंपसंच (जलपरी)  ५HP- BIS/ISI केंद्र शासनाने ठरवुन दिलेल्या संस्था व्दारे प्रमाणित असावे. महत्तम अनुदानाची मर्यादा खरेदी किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त मर्यादीत अनुदान रुपये ८०००/- प्रती नग देय राहील.
       तसेच सदर योजनेचा लाभ घेणेकरता अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
           विहीत नमुन्यातील अर्जासोबत स्वत:चे नांवे असलेले ७/१२ व ८-अ चे अद्यावत उतारा सादर करणे आवश्यक राहिल. यापुर्वी लाभार्थ्याकडे ट्रॅक्टर नसलेबाबतचा दाखला असावा तसेच या किंवा इतर योजनेतुन ट्रॅक्टर या घटकाकरीता लाभ घेतला नसलेबाबतचा दाखला असावा. खरेदी करावयाचे ट्रॅक्टरचे कोटेशन जोडणे आवश्यक राहील. कडबाकुट्टी यंत्रासाठी ५ जनावरे असल्याचा पशु वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला, विदयुत पंपसंचा साठी पाण्याचा स्त्रोत व विदयुत जोडणी असणे आवश्यक आहे. रोटॅव्हेटर खरेदीनंतर रोटॅव्हेटरचा वापर करण्यासाठी ट्रॅक्टर असलेबाबतचा पुरावा म्हणुन आर.सी.बुक जोडणे आवश्यक आहे. 
           अर्ज करावयाची मुदत दिनांक ०१/०८/२०२४ ते ३०/०८/२०२४ पर्यंत राहील याची जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,