'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !
'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !
नाशिक( प्रतिनिधी ) प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेल्या ' श्री दत्त महात्म्य ' या ग्रंथाचा आजच्या सुलभ मराठीत भावानुवाद असलेला निरुपणकार पद्माकर देशपांडे यांचा 'श्री दत्त महात्म्य कथामृत ' हा ग्रंथ आषाढ शुद्ध प्रतिपदा टेंबे स्वामी यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील दत्त मंदिरात लोकार्पण करण्यात आला. मुंबईच्या प्रसिद्ध नवचैतन्य आणि हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
या सोहळ्यास प. प. दंडी स्वामी वल्लभानंद महाराज, दंडी स्वामी वामनानंद महाराज, दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुभाष भिसे, दीपक साधले, ट्रस्टी गुरुनाथ गाणपत्ये, परमपूजनीय विमल भाई, वैभव पेंढारकर, नाशिकच्या श्री दत्त सेवा समितीचे संस्थापक प्रभाकर पाठक, समितीचे अध्यक्ष व नाशिकच्या गणेश बाबा देवस्थानचे विश्वस्त विवेक महाराज दंडवते, माणगाव देवस्थानचे व्यवस्थापक शिवराम काणेकर, अनिल राज कवीश्वर आदींसह राज्यभरातून आलेले वासुदेवानंद सरस्वती यांचे परंपरेतील भाविक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा