गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक(नंदुरबार)::- गट विकास अधिकारी (वर्ग १) विजय लोंढे व सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे पंचायत समिती अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आलोसेे यांची एकुण २६०००/- रु. अशी लाचेची मागणी आलोसे लाडे यांनी केली. गटविकास अधिकारी लोंढे साठी १८०००/- रुपये व सहाय्यक लेखाधिकारी लाडे यांनी स्वतः साठी ८०००/- रु. लाचेची मागणी केली होती .
तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. नमुद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल २४६८५०/- रु. ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले. परंतु सहाय्यक लेखाधिकारी यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्या साठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी ८०००/- रु. ची मागणी केली व गटविकास अधिकारी यांच्यासाठी १८०००/- रू. ची मागणी केली. आज रोजी पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाडे यांनी ८०००/- लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. तसेच गटविकास अधिकारी लोंढे यांनी तक्रारदार यांच्याकडून १८०००/- रू. लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा