अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

नाशिक::- येथील ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड‌ डिझॅबल्ड या संस्थेच्या वतीने डॉ. हेलेन केलर यांच्या जयंती निमित्त २७ जुन २०२४ रोजी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे दिव्यांग व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ व एम.एस.एल. ड्राइवलाइन सिस्टीम कंपनीचे पर्सनल मॅनेजर हेमंत राख उपस्थित होते. दोन्ही पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती करून घेतली व आपण देखील संस्थेला सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले इतर मान्यवर पिंपळगाव कृषी उत्पन्न समिती चे अध्यक्ष पाटील व विंचूरहून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले अशोक लोळगे व परिवार यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपक्रमासाठी आर्थिक मदत केली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कृष्णकुमार चावरे, विद्या जगताप, नीमिता शेजवळ आदी उपस्थित होते.

या प्रसंगी संस्थेचा परिचय अध्यक्ष विकास शेजवळ यांनी केला तर सूत्रसंचालन महासचिव रामदास जगताप यांनी केले तर मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी  यांनी उपस्थितांचे आभार मानले व ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, दप्तर, कंपास, पेन्सिल, वॉटरबॉटल आदी वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोरख पठारे, श्रीपत मोगल व साई बाबा हार्ट इन्स्टिट्यूट चे कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल