विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !
विनामूल्य मैफल !
अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !
नाशिक ( प्रतिनिधी) -अफलातून म्युझिक लव्हर्स व संतोष फासाटे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ग्रुपतर्फे सूरसम्राज्ञी लता (भाग २) हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी दि.२९ रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता ही विनामूल्य मैफल परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगेल. यावेळी लतादीदींचा सुरेल सुवर्णकाळ अनुभवायला मिळणार आहे.
सुप्रसिद्ध गायिका नमिता राजहंस, अपर्णा देशपांडे, डॉ. विशाखा जपताप, अश्विनी सरदेशमुख, मीनाक्षी भुतडा, सीमा जाधव, स्वाती जाधव, अर्चना सोनवणे लतादीदींनी गायलेली लोकप्रिय गाणी सादर करतील. त्यांना ख्यातनाम सुमधुर गायक हरीशभाई ठक्कर, मयूर तुकडिया, मनोज पळसकर, राजू पवार व उमेश मालवी स्वरसाथ करणार आहेत. त्याचबरोबर संतोष फासाटे यांच्या खुमासदार निवेदनामध्ये लतादीदींचा प्रदीर्घ जीवनप्रवास, त्यांचा संघर्ष, अलौकीक प्रतिभा व अविस्मरणीय आठवणींनाही उजाळा देण्यात येणार आहे. प्रकाश गोसावी पाहुणे गायक तर विशेष सहकार्य सुनील भुतडा यांचे लाभले आहे. पवन वंजारी ध्वनी संयोजन करतील. कार्यक्रमाची संकल्पना अफलातून म्युझिक ग्रुपचे अध्यक्ष हरीषभाई ठक्कर व संतोष फासाटे यांची आहे. सर्वांना प्रवेश विनामूल्य असून रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा