अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !
अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !
नासिक::- नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान कोट्यवधी रुपये निधी मंजूर होऊन खर्च करण्यात आला परंतु तिथे अद्यापही पूर्णपणे सुविधा जॉगर्स धारकांना मिळत नाहीत.
पुर्वी ज्या समस्या होत्या त्या अजूनही जशाच्या तशा कायम आहेत. मैदान विकसीत होऊन समस्या मिटतील असे वाटत होते. परंतु त्या समस्या तत्पूकाळ सुटण्याऐवजी हळूहळू पूर्व पदावर येत आहेत मग मैदान विकसित करून मिळवले काय हा प्रश्न कायम आहे, आज मैदानात झाडांना पाणी मारले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हिरवळ तयार करून हिरवाईचा हिरवा रंग राहिला नाही,
संध्याकाळी मैदानात वाहने येतात अन जातात यावर कुठलेही निर्बंध नाही. मैदानात रात्री टवाळखोरांची मनसोक्त सोय होते, प्रेमीगुलांचा तर प्रेमाचे अड्डे निर्माण झाले आहेत. मग या मैदानाला सुसज्ज कसे म्हणता येईल. मैदान विकसित केले तरी मैदानाची देखभाल होत नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मैदानाची अशी अवस्था असेल तर बाकीच्या मैदांनाचे काय ? या सर्व बाबीकडे प्रशासनाकडून लक्ष देण्यात यावे म्हणून मोरया जॉगर्स ग्रुप तर्फे महानगरपालिका आयुक्त यांना सहीनिशी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक मुकेश शहाणे, प्रवीण तिदमे, मोरया जॉगर्सचे अध्यक्ष भगवान पाटील, शेखर निकुंभ, अर्जुन गोडसे, सुनील उदमले, हेमंत कराड, संदीप वारुडे, सचिन हेकरे, सागर देवरे, दीपक गांगुर्डे, सतीश विशे, सुनिल लहामगे, संजय पगारे व इतर सभासद उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा