संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान

संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान 
          नाशिक::- सर्व भारतीयांना गुण्यागोविंदाने एकत्र ठेवण्याची ताकद आपल्या संविधानामध्ये आहे. अशा संविधानाची अमोल भेट पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिली. संविधानाच्या जोरावर व मार्गावर आपण सर्व भारतीयांनी आपला देश व देशातील लोकशाही मजबूत ठेवण्याचे आवाहन अल्जामीयातुल इस्लामिया एजुकेशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हफिजुल्लाह खान यांनी केले. 

           सातपूर - अंबड लिंकराेडवरी आझादनगर येथील अल्जामीयातुल इस्लामिया एज्यकेशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा फिदा हूसैन ताबीर अली चाैधरी, जनरल सेक्रेटरी आबीद अली हफिजुल्लाह खान, सदस्य अबरार अहमद अजिमुल्लाह खान, हुसैन अली माेहम्मद खान, मौलाना अब्दुल हमीद चौधरी  उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अमिरूनिस्सा, शिक्षक शाहिद, शोएब, झुबेर, संदीप, मुसद्दीक यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही