लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !


लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

       नासिक/जळगाव::- आलोसे प्रशांत विकास जगताप, (कंत्राटी वायरमन) जळगांव जि.जळगांव याने १६००००/- लाचेची मागणी केली होती, त्यातील १०००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

   यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांव च्या पथकाने भेट दिली होती. सदर भेटीनंतर त्यांना आता चार लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता एक लाख साठ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती एक लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष एक लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर जळगांव शहर पोलीस स्टेशन ता.जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
            सापळा पर्यवेक्षण अधिकारी सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव‌ यांचेसह सापळा पथक सफौ दिनेशसिंग पाटील, पोना. सुनिल वानखेडे,पो.ना. बाळू मराठे ,पोशी. राकेश दुसाने, कारवाई मदत पथक एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. प्रणेश ठाकुर, पो.शि.  अमोल सूर्यवंशी, पो. शि. सचिन चाटे यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक,  नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही