प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !
नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत इगतपूरी, पेठ व त्र्यंबकेश्वर येथे विविध योजनांच्या शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोठया प्रमाणात लाभ देण्यात येत असून विविध योजनांचे प्रमाणपत्र व कार्ड वितरीत करण्यात आले आहे, असे नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
या शिबीरात जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री विश्वकर्मा, जनधन योजना, घरकुल योजना, किसान सन्मान योजना, पी. एम. किसान कार्ड, सुकन्या समृध्दी योजना, मातृ वंदना योजना, जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा योजना, पेंशन योजना, सुरक्षित मातृत्व योजना, जातीचे दाखले व सिकलसेल मिशन आदीबाबत मार्गदर्शन करुन विविध योजनांचे प्रमाणपत्र व कार्डचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले असल्याचेही श्री. रहमान यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा