पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

इमेज
स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४   नाशिक  ( जिमाका वृत्तसेवा ):     महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्तीत संख्येने मतदान करावे यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता  ‘ वोटोथॉन’ चे आयोजन केले आहे. या ‘वोटोथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्येक नागरिकांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात काल सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ.गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

इमेज
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात  आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही              नाशिक ( प्रतिनिधी )  समाजातील सर्व घटकांसाठी काम केलेल्या मध्य नाशिक विधानसभेतील आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित‌ होणार. अशी ग्वाही मंगळवार ( दि.१२) सकाळ- सायंकाळच्या सत्रात भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.     भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या  ‌‌पस्थितीत प्रभाग क्र.१२ मधील गायकवाड नगर, प्रथमेश नगर, मातोश्री नगर व गणेश कॉलनी या परिसरात  घरोघरी प्रचार संपर्क साधला. मध्य नाशिक विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार प्रा. सौ. देवयानीताई फरांदे यांना आपले बहुमुल्य मत देऊन विजयी करावे असे आवाहन करण्यात आले. परिसरातील रहिवाशी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व आपले अमूल्य मत विकासपर्वाला असेल असे निक्षून सांगितले.    घरोघरी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अभय छल्लाणी, नंदकुमार देसाई, नरेंद्र सोनवणे, प्रदीप पाटील, कैलास चौधरी, अविनाश जासुंदे, शिरीष भुमकर, भाजपा  ज्येष्ठ कार्यकर्त्या  भारती

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल

इमेज
'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन !  उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी  'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल      नाशिक(२६):- आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसापासून दूर चालला आहे. नव्या माध्यमांमुळे वाचन कमी होऊ लागलं आहे. अशा काळात वाचकांना आवडेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा संवेदनशील साहित्याचा वसा 'लोकराजा दिवाळी अंका'ने प्राणपणाने जपला आहे, असे उद्गार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले.      साप्ताहिक न्यूज मसालाच्या १३ वी आवृत्ती 'लोकराजा दिवाळी विशेषांका' चे प्रकाशन साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमध्ये ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ. चौधरी, ज्येष्ठ पत्रकार आणि नाशिक पुढारी आवृत्तीचे संपादक मिलिंद सजगुरे, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे संपादक नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आयोजित पिंक मेलाया महिन्यात ९०% कमी खर्चात होणार मॅमोग्राफ चाचणी, पॅप स्मीअर आणि मोफत सल्ला

इमेज
ब्रेस्ट   कॅन्सर   जनजागृती   महिन्यानिमित्त   एचसीजी   मानवता   कॅन्सर   सेंटर   आयोजित   पिंक   मेला या   महिन्यात  ९०%  कमी   खर्चात   होणार   मॅमोग्राफ   चाचणी ,   पॅप   स्मीअर    आणि   मोफत   सल्ला   नाशिक(२२)::नाशिक शहरातील प्रमुख कर्करोग विशेषता रुग्णालय एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरने कर्करोग जागरूकता महिन्यातील उपक्रमांचा भाग म्हणून २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी पिंक मेला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्तन कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणाबद्दल जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या कार्यक्रमात २० वर्षांवरील महिलांना दिग्गज डॉक्टरांकडून मोफत सल्ला ही देण्यात येणार आहे.  यावेळी तज्ञ डॉक्टरांची एक टीम महिलांच्या वैद्यकीय इतिहासाची तपासणी करेल, ज्यामध्ये स्तन कर्करोग किंवा अन्य संबंधित स्थितींचा समावेश असेल, तसेच आवश्यक असल्यास शारीरिक तपासणी देखील करण्यात येईल. यासोबतच या महिन्यात रुग्णालयाकडून मॅमोग्राफी तपासणी फक्त ५५० रुपयांमध्ये करून देण्यात येणार आहे. सामान्य काळात मॅमोग्राफी तपासणी शुल्क ७१५० रुपये इतके असते.                      भारतात महिलांमधील कर्करोगात ३० टक्के प्

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

इमेज
सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !          नासिक::- किरण रंगनाथ दराडे, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक, व सचिन प्रभाकर पाटील, कनिष्ठ सहाय्यक, (लेखा )वित्त विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांना ११०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.               यातील तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण १८ सेवा पुस्तके लोकसेवक किरण दराडे यांच्याकडे जमा केली होते. सदर १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून  वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे ७००/-रुपये याप्रमाणे १८ सेवा पुस्तकांचे १२६००/- रुपयांची मागणी करून,  तडजोडीअंती  ११०००/- रुपयांची मागणी करून सदर लाचेची रक्कम लोकसेवक किरण दराडे यांच्या सांगण्

विधानसभा निवडणुक आढावा - केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन !

इमेज
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि  शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन   मुंबई::-   महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या  शिष्टमंडळाचे रात्री  ८  वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले.  महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी ,  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव उपस्थित होते.            भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा ,  वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास ,  वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग ,  उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार ,  उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार ,  उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू ,  उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार ,  उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

इमेज
महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे मालेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण नाशिक : मालेगाव शहरातील कॅम्प भागात महिला व बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार केले जातील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले             मालेगाव, जि. नाशिक येथे आज दुपारी १०० खाटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, मुख्यमंत्री जनकल्याण विभागाच्या समन्वयक डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे आदी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, मालेगाव शहरासाठी सुरुवातीला ४० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले. पुढे त्याच

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

इमेज
सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, अध्यक्षपदी खासदार भास्कर भगरे तर कार्याध्यक्षपदी के.के अहिरे यांची निवड               नाशिक( प्रतिनिधी)::- शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना एकत्र करून समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून खासदार भास्करराव भगरे तर कार्याध्यक्षपदी के.के.अहिरे यांची निवड करण्यात आली असून कार्यवाहपदी अरुण पवार यांची निवड करण्यात आली. या समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, रविंद्र मोरे, दौलतराव मोगल, साहेबराव कुटे, संजय चव्हाण, एस.के.शिंदे, अशोक दुधारे, यांची निवड करण्यात आली. तसेच सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुढीलप्रमाणे समन्वय समिती कार्यकारिणी ठरवण्यात आली. यात समन्वय समितीचे अध्यक्षपदी खासदार भास्कर भगरे  यांनी स्वीकारावं, अशी विनंती सर्वानुमते करण्यात आली. त्यांनी सर्वांच्या विनंतीला मान देवून अध्यक्षपद स्वीकारले त्यांनी त्यांच्या मनोगतात इथून पुढे शिक्षकांचे जे काही प्रश्न

भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी आयोजन...!

इमेज
भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी म्हाळसाकोरे येथे आयोजन...!        नाशिक ( प्रतिनिधी )::-  अखिल भारतीय महानुभाव परिषद पुरस्कृत नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव सोहळा दि. ४ व ५ सप्टेंबर रोजी म्हाळसाकोरे (ता. निफाड ) येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच याच दरम्यान श्री दत्त मंदिर हिवरगाव येथील दत्त मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे.               भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव यावर्षीपासून शासकीय स्तरावर देखील साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक (जीआर ) महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कार्यालयांना जारी केला आहे. त्याचप्रमाणे भगवान श्री चक्रधर स्वामी (अवतार दिन ) जयंती उत्सव दि. ४ व ५  रोजी जय शिवशंकर गार्डन रिसॉर्ट (सिन्नर रोड ) म्हाळसाकोरे येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.        बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय विद्यालयीन व महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा होणार असून दुपारी ३ वाजता म्हाळसाकोरे गावातून  मिरवणूक

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !

इमेज
‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात  तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट,  मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम ! ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !       नाशिक(प्रतिनिधी)::- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाने गेल्या दोन वर्षांत ठेवी ७९ कोटींवरून १२४ कोटींपर्यंत वाढविल्या आहेत. म्हणजेच ४५ कोटींची वाढ झाली आहे. ३८ कोटी ३५ लाख कर्जपरतफेड केली आहे. याबरोबरच विनाअनुदानित तत्वावरील सेवकांना चालू वर्षात ३० कोटी रुपयांची पगारवाढ दिली आहे. ३१ कोटी ९३ लाख रुपये संस्थेच्या विविध शाखांतील इमारतींच्या बांधकामावर खर्च केले आहे. अशा पद्धतीने संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस ॲड. डॉ. नितीन ठाकरे यांनी केले.           मविप्र संस्थेच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात रविवारी (दि.०१) पार पडलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ११० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षत

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी आज होत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ बाबत दिलेली सविस्तर माहिती व मांडण्यात आलेली महत्त्व पूर्ण व ठळक बाबींसह, शाखा, उपक्रम, नियोजन, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना याचा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला लेखाजोखा जसाच्या तसा फक्त न्यूज मसाला वर !

इमेज
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी आज होत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ बाबत दिलेली सविस्तर माहिती व मांडण्यात आलेली महत्त्व पूर्ण व ठळक बाबींसह, शाखा, उपक्रम, नियोजन, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना याचा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला लेखाजोखा जसाच्या तसा फक्त न्यूज मसाला वर ! नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मविप्रचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे. समवेत उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ऍड. संदीप गुळवे. नमस्कार, आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या प्रिंटिंग आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत आपणा सर्व मान्यवरांचे मी मविप्र परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बडोदानरेश सयाजीराव गायकवाड महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंद

वाढवण बंदरामुळे पाच वर्षांत बेरोजगारी शून्यावर‘जेएनपीए’चे चेअरमन उन्मेष वाघ : केबीटी कॅफे, पॉलिटेक्निकच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन !

इमेज
वाढवण बंदरामुळे पाच वर्षांत बेरोजगारी शून्यावर ‘जेएनपीए’चे चेअरमन उन्मेष वाघ :  केबीटी कॅफे, पॉलिटेक्निकच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन !          नाशिक(प्रतिनिधी )::- साडे चार वर्षांत सखोल अभ्यास करून सर्व विरोधाचे वातावरण शांत करून वाढवण बंदराचा आराखडा तयार केला. स्थानिकांच्या सर्व शंकांचे समाधान केले आणि समुद्र किनाऱ्यापासून सहा किलोमीटर आतमध्ये वाढवण बंदर हा प्रकल्प उभा करण्याचे निश्चित केले. या बंदरामुळे देशाच्या जीडीपीमध्ये १ टक्क्याने वाढ होणार असून, विकसित भारताचे स्वप्नही साकार होणार आहे. १० वर्षांत एक कोटी रोजगार तयार होणार आहे. पाच वर्षांत बेरोजगारी शून्य करण्याची ताकद या प्रकल्पात आहे, असा दावा जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे (जेएनपीए) चेअरमन उन्मेष वाघ (आयआरएस) यांनी केला.             मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘वाढवण बंदर-एक व्यावसायिक संधी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. तत्पूर्वी उन्मेष वाघ यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे आणि कर्मवीर

मराठी वृत्तपत्र बंद होतील की काय अशी भीती आहे-सुमेध काले

इमेज
मराठी वृत्तपत्र बंद होतील की काय अशी भीती आहे-सुमेध काले नाशिक::- मराठी भाषेसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले नाहीतर फार वाईट दिवस येतील मराठी वृत्तपत्र बंद होतील, मराठी शाळा वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जीएसटीचे माजी आयुक्त सुमेधजी काले यांनी केले. ते कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "असे होते कुसुमाग्रज" या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.            भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना व जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आदरणीय कुसुमाग्रजांनी माय मराठीची गाथा सांगता सांगता व्यथा व अवस्था यावर प्रकाशझोत टाकला. इतर भाषांविषयी आदर बाळगताना मातृभाषेचा अभिमानाने स्वीकार केल्यास समाजमन अधिक सुदृढ, सृजनशील व कणखर होते, या विचारास त्यांनी अधोरेखीत केले. याच विचारांनी प्रेरीत होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनमानसात, कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी "कुसुमाग्रज मराठी विचार मंच"  ची वाटचाल सुरू आहे.            संस्थेच्या उद्दीष्टांची, क

आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे - प्रतिभा संगमनेरे अभिनंदनीय ::- सभासदांना आठ टक्के लाभांशासह सहा लाखांचे विमा कवच, संस्थेची बिनविरोध निवडणूक आणि अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी !

इमेज
आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे - प्रतिभा संगमनेरे                              अभिनंदनीय ::- सभासदांना आठ टक्के लाभांशासह सहा लाखांचे विमा कवच, संस्थेची बिनविरोध निवडणूक आणि अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी !    ***************************************     नाशिक::- नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सभासद पाल्य विद्यार्थी गुणगौरव, सेवानिवृत्त सभासद सन्मान सोहळा व नुतन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा श्रीमती प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली व रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक तसेच डॉ.राजेंद्र बागुल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.             वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने सेवा निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा उपस्थित मान्यवर यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.     

सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- सामान्य प्रशासन विभाग जळगाव येथील वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे ( वर्ग ३ ) यांस १,८०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार हे लोकसेवक असुन तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे २,००,०००/- रू.मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे दि. २१ रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचासमक्ष  तडजोडअंती १,८०,०००/- रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सालाबादप्रमाणे ओम् साई वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न !

इमेज
सालाबादप्रमाणे ओम् साई वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न ! नासिक::-  ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड डिझॅबल्ड या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ११ ऑगस्ट २०२४ रोजी नाशिक येथील मविप्र संस्थेच्या समाज कार्य महाविद्यालयात नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार येथून आलेल्या इयत्ता १०वी, १२वी व पदवी उत्तीर्ण अंध (दिव्यांग) विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक इंडस्ट्रिअल पर्सनल मॅनेजर या संस्थेचे पदाधिकारी राजाराम कासार, राजेंद्र आचारी, प्रकाश गुंजाळ व केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपत काळे सर उपस्थित होते. प्रारंभी अंधांचे कुलदैवत लुई ब्रेल व डॉ. हेलेन केलर यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष विकास शेजवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेचा परिचय करुन दिला. त्यानंतर पाहुण्यांचे मनोगते झाले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना राजाराम कासार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आपण सदैव संस्थेसोबत आहोत असे सांगितले