सातारा रत्न पुरस्कारासाठी आवाहन !

सातारा रत्न पुरस्कारासाठी आवाहन !

न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक
7387333801

         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहून तिथल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातारा वासियांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या 'आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान' संस्थेच्या वतीने दसरा मेळावा व स्नेहसंमेलन सोहळा दि. २३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, सहकार, उद्योग, कायदा, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय, कामगार, साहित्य, कला व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील किर्तीवंतांचा सत्कारदेखील करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराट्रातून सातारकराना नामांकने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दसरा मेळावा व स्नेहसंमेलन निमित्त मान्यवरांना त्यांची नामांकने दि. १८-१०-२०२३ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात पाठवायची आहेत. सोबत संपूर्ण माहिती, कार्याचा आढावा, गावाचे नाव व तालुका, नामांकन क्षेत्र ¸छायाचित्र पुढील पत्त्यावर किंवा ईमेल द्वारे पाठवावे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई¸ बी-१ प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई ४०००१२ . दूरध्वनी ९९६७९१५५७७ /९९८७१९९५६५/ ०२२ २३७०१५६० ई मेल : amhisatarkar12@gmail. com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

८ जानेवारीच्या देशव्यापी संपाचे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ...! संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे आवाहन तर संपात उतरणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले !! दोन्ही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!