वर्ग २ अधिकारी लाच स्वीकारताना ताब्यात !
वर्ग २ अधिकारी लाच स्वीकारताना ताब्यात !
नासिक::- राज्यकर अधिकारी, वर्ग-२, आलोसे जगदीश सुधाकर पाटील, वस्तू व सेवा कर कार्यालय, नाशिक यांस ४०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असून जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटी चा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४०००० रुपयांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.
सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. प्रकाश महाजन, सर्व नेमणूक ला. प्र. वि. नाशिक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा