जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !
जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !
नासिक::- मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे पार पडलेल्या बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात सर्व वजनी गटात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले. बेल्ट रेसलिंग मास रेसलिंग या क्रीडा प्रकारातील वजनी गटातील विजेते पुढील प्रमाणे
४० कि. गटात प्रेम धुळे
५० कि. गटात तेजस बोरसे
५५ कि. गटात विक्रम कुंदे
६० कि. गटात कृष्णा कुंभारकर
६५ कि. गटात ओम निकम
७० कि. गटात मकरंद कुमावत
७० कि. गटात प्रशिक जाधव
+७० कि. गटात ऋषिकेश शिंदे
४० कि. गटात धर्मराज खोडे
+५० कि. गटात यश निरभवणे
तसेच महिला विजेत्या खेळाडू पुढीलप्रमाणे
३५ कि. गटात जयश्री गायकवाड
४० कि. गटात प्रतीक्षा गवळी
४० कि. गटात रक्षा कानडे
४५ कि. गटात फौजीया शेख
५० कि. गटात वेदश्री कुलकर्णी
५० कि. गटात ममता शिर्के
५५ कि. गटात मैत्री अहीरे
५५ कि. गटात आदिती मते
+५५ कि. गटात अक्षदा तालखे
हे सर्व खेळाडू विजयी झाले असून सर्वांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सदर खेळाडूंना महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुचिता सोनवणे व क्रीडा संचालक प्रा. किशोर राजगुरू यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांत हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिताताई हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे (पाटील), महाविद्यालय विकास समितीच्या उपाध्यक्षा डॉ. योगिता हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा