महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक::- आलोसे स्नेहल सुनील ठाकुर, व्यवसाय अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी कार्यालय, क्रुषी औद्योगिक संघ ली. इमारत क्र. ३, द्वारका नाशिक यांनी तक्रारदाराकडे ५००० रुपयांची लाच मागितली होती, तडजोडीअंती ४००० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रीयल सेक्यूरिटी सर्व्हिसेस ही कंपनी दोन वर्ष पासुन बंद असल्याने तिचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी व्यावसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. सदर व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या बदल्यात लोक सेविका स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष लाच मागितली व ती स्विकारताना पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सापळा अधिकारी, विश्वजीत पांडुरंग जाधव, पोलीस उपाधिकारी, सापळा गाव पो. ह .प्रकाशे, पो. ना. प्रणय इंगळे, म. पो. शि. शितल सूर्यवंशी, चालक पो. ह. संतोष गांगुर्डे, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिकारी, नरेंद्र पवार, वाचक, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिकच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा