उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

    नासिक/ जळगाव::- ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते, उपविभागीय अभियंता, वर्ग-१, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, यांस ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. 

          तक्रारदार यांनी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी रुरबन' या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता. चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता. चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात  तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून ४ लाख रुपये लाचेची  रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा. 
           सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे, पो. ना. अविनाश पवार, पो. ना. सुरेश चव्हाण यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक,  ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !