मत प्रदर्शन -(३) पद्माकर वाघरूळकर, छत्रपती संभाजीनगर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

मत प्रदर्शन -(३) पद्माकर वाघरूळकर, छत्रपती संभाजीनगर,
स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !



       १) स्त्रिया उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी नोकरी करणे गरजेचे आहे का ?
उत्तर: नाही परंतु मुळात शिक्षणाचा आणि नोकरीचा सुतरामही संबंध नाही नोकरी मिळविण्यासाठी शिक्षणाबरोबरच कौशल्यांचीही आवश्यकता असते हे खरे आहे परंतु प्रत्येक शिक्षितांना नोकरी मिळेलच याची १००% शाश्वती नाही. आणि मी सुशिक्षित स्त्री म्हणून मला नोकरी मिळालीच पाहिजे हा अट्टहास/दुराग्रह धरणेही चूकच आहे.
         २) जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी ?
उत्तर :  हाही विचार चांगलाच परंतु त्यामुळं स्वतःचा वैचारिक कोंडमारा होता कामा नये.
           ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे नोकरीची,  त्याला ती मिळाली ?
उत्तर:- माझ्या नोकरी न केल्यामुळे जर इतर बेरोजगारांना संधी मिळत असेल मी मला गरज नसताना नोकरी न केलेली बरी हा विचार खूपच चांगला.
           ४)एवढे शिकून घरात बसले तर शिक्षण फुकट जाते का ?
उत्तर : अजिबात नाही. उलट शिक्षित माताच आपल्या पाल्यांचं जीवन चांगलं घडवू शकतात. सुशिक्षित आणि सुसंस्कारी असल्यास अजूनच चांगले.
           ५) स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग समाज सक्षम करण्यासाठी कसा करता येईल असा विचार केला तर कितपत योग्य आहे ?
उत्तर : सामाजिक भान व बांधिलकी प्रत्येकांनीच जपलेली चांगली. सर्वत्रसुखिणंःसन्तू सर्वेसन्तूनिरामयाः ही भावना सदासर्वकाळ सर्वोत्तमच.
        ६) ती जर हाऊस वाईफ असेल तर तिला दुय्यम स्थान दिले जाते का ?
उत्तर : सगळीकडेच हे चित्र नाही. उलट काही घरात तर हाऊस वाईफ/गृहिणींना नोकरीवाल्यांपेक्षाही वरचे/मानाचे स्थान आहे.
         ७)आजकाल नोकरीच्या नावाखाली मुली संसारात दुर्लक्ष करताना दिसतात का?
उत्तर : सरसकट नाही काहींचे होत असतील म्हणून सर्व नोकरीवाल्यांना दोषी धरू नये.
        ८) मी कमवती आहे हा रूबाब दाखवून महिन्यात घटस्फोट ही चिंताजनक बाब आहे ना?
उत्तर : होय, नक्कीच! पण तिला तो रूबाब का दाखवावा वाटतो/लागतो आणि घटस्फोटापर्यंत वेळ का येते यावरही विचारमंथन होणं आवश्यक आहे.

       पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर, (दत्तिंदुसुत)
            छत्रपती संभाजीनगर.

भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम विषय: मत प्रदर्शन,
हा एक भारतीय कोल्हापूर मंच आयोजित  मतप्रदर्शन उपक्रम असून सदर लिखाण हे लिहिणाऱ्या चे वैयक्तिक मत आहे, या मतांशी संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही.
            संपादक
     न्यूज मसाला, वृत्तसेवा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

८ जानेवारीच्या देशव्यापी संपाचे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ...! संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे आवाहन तर संपात उतरणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले !! दोन्ही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!