मत प्रदर्शन -(२) कु. सुरज गेल्ये, रत्नागिरी स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !
मत प्रदर्शन -(२) कु. सुरज गेल्ये, रत्नागिरी
स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !
१) स्त्रिया उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी नोकरी करणे गरजेचे आहे का ?
उतर) नाही, तिने नोकरीच करावी हे गरजेचे नाही. तिला जे पाहिजे ते करू द्यावे.
२) जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी ?
उतर) स्वतःची पण काही स्वप्न असतीलच ना ? ती पूर्ण करण्यासाठी...
३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरच अत्यंत गरज आहे नोकरीची त्याला ती मिळाली तर…..?
उतर) उत्तमच
४) एवढे शिकून घरात बसलीस तर शिक्षण फुकट जाते का ? भावी पिढी घडवण्यासाठी उपयोग होईल ना…….?
उतर) नाही. भावी पिढी घडण्यासाठी तिच्या शिक्षणाचा उपयोग होणारच.
५) स्त्रियांनी स्वतः च्या ज्ञानाचा उपयोग समाज सक्षम करण्यासाठी कसा करता येईल असा विचार केला तर कितपत योग्य आहे ?
उतर) खूप चांगलं होईल, समाज सुधारेल..
६) ती जर हाऊस वाईफ असेल तर तिला दुय्यम स्थान दिले जाते का ?
उतर) नाही, सर्वच ठिकाणी नाही, काही ठिकाणी पतीबरोबरचे प्रथम स्थान दिले जाते...
७) आजकल नोकरीच्या नावाखाली मुली संसारात दुर्लक्ष करताना दिसतात का ?
उतर) सर्वच नाही, काही करतात.
८) मी कमवती आहे हा रुबाब दाखवून महिन्यात घटस्फोट चिंताजनक बाब आहे ना ……. ?
उतर) हो, चिंताजनक आहे.
कु. सुरज रविंद्र गेल्ये.
रत्नागिरी.
भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम विषय: मत प्रदर्शन,
हा एक भारतीय कोल्हापूर मंच आयोजित मतप्रदर्शन उपक्रम असून सदर लिखाण हे लिहिणाऱ्या चे वैयक्तिक मत आहे, या मतांशी संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही.
संपादक
न्यूज मसाला, वृत्तसेवा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा