‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !
‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !
नाशिक (प्रतिनिधी) : पुस्तक प्रकाशने, दिवाळी अंकाची प्रकाशने ही प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र नाशिक येथे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हातून दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ या अंकाचे प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशनाचा अनुभव प्रत्येकाला निश्चितच सुखावणारा होता.
असोसिएशनतर्फे नागरी सहकारी बँकांच्या गुणवत्तापुर्ण व्यवस्थापन तसेच अधिकारी व कर्मचार्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले. ‘गुरूदक्षिणा’, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी विद्यानगर कॉलेजरोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘क्षितिज’ अंकाचे प्रकाशन अभिनव पद्धतीने करण्यात आले.
या समारंभासाठी महाराष्ट्रातून कानाकोपर्यातून आलेल्या उपस्थितांची संख्या ९०० हून अधिक होती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट होते. यामध्ये नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. असोसिएशनचे मुखपत्र असलेले ‘क्षितिज’ मासिक बँकिंग क्षेत्रातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञान, ध्येय-धोरणे, डिजीटल क्रांती, व्यवस्थापन आदि विषयांवर बँकिंग तज्ञांचे व अभ्यासक्रमांचे लेखन प्रसिद्ध करत असते. कॉर्पोरेट बँकिंग विषयी ग्राहक सेवा आदि विषयांचाही अंकातून परामर्ष घेण्यात येतो. ‘क्षितिज’ अंकाचा बँकिंग क्षेत्रात नावलौकिक आहे. असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी अंकाच्या स्वरूपात लक्षणीय बदल केला आहे.
गेली २४ वर्षांनंतर प्रथमच पुरस्कार वितरण सोहळा मुंबई बाहेर संपन्न झाला. असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या नियोनजबद्ध मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा उदंड प्रतिसादात संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी रेल्वे मंत्री, भारत सरकार तथा चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑप.), सहकार मंत्रालय, भारत सरकारचे मा.खा. सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे सहकार आयुक्त तथा सहकार निबंधक सहकारी संस्था पुणे, महाराष्ट्र शासन, अनिल कवडे, अध्यक्ष-महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबईचे अजय ब्रह्मेचा, अध्यक्षा - सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश डॉ.श्रीमती शशिताई अहिरे हे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा