बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३, रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!
बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३,
रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!
नासिक (प्रतिनिधी)::- बाबाज् थिएटर्स ही संस्था गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रभर सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. १७ सप्टेंबर २००० रोजी संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने यावर्षी होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याचा शुभारंभ बुधवार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ०६:०० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कथक नृत्यांगना निकिता सिंग (दिल्ली) यांचे एकल कथक नृत्याचे सादरीकरण होणार आहे, त्यांना या सादरीकरणात नाशिक मधील तबलावादक कुणाल काळे, गायक पुष्कराज भागवत व सितार वादक प्रतीक पंडित साथसंगत करतील. या कार्यक्रमाची सुरुवात सितार वादक प्रतीक पंडित यांच्या एकल वादनाने होईल, त्यांना नाशिक मधील उभरते तबला वादक अद्वय पवार साथ संगत करतील.
सर्व रसिक श्रोत्यांनी या अलौकिक व विनामूल्य अशा दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बाबाज् थिएटर्स तर्फे प्रशांत जुन्नरे, अमोल पाळेकर, कैलास पाटील, डॉ. प्रमोद शिंदे, नारायण गायकवाड, एन. सी. देशपांडे, योगिता पाटील व प्रा. डॉ. प्रितीश कुलकर्णी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा