मत प्रदर्शन -(१):: स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम विषय: मत प्रदर्शन,

स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ?


      १) स्त्रिया उच्चशिक्षित आहेत म्हणून नोकरी करणे गरजेचे आहे का? 
            उच्च शिक्षित आहे, नोकरी करायलाच पाहिजे असे नाही, घरी बसून छोटे-मोठे उद्योग करू शकता, थोडेफार कमवायला पण शिकले पाहिजे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे, प्रत्येक वेळी समोरच्याच्या समोर हात पसरणे योग्य वाटत नाही, कधी कधी मन मारून शांतही बसावे लागते. 
      २)  जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी? 
            घरची परिस्थिती चांगली असेल तर अजिबात नोकरीच्या मागे लागू नका. एखाद्या गरजूला फायदा होईल. त्याचे कुटुंब तरी सुखी होईल. जे आपल्याला हवे ते मिळत असेल तर नोकरी मागे धावून स्वतःचे स्वास्थ्य हरवू नका, जगण्याचा आनंद घ्या. 
          ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरंच अत्यंत गरज आहे नोकरीची त्याला मिळाली तर...?
             खरोखर आनंदाची गोष्ट आहे.ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणं लागतो. काहीच करता येत नसेल तर गरजवंताची गरज तरी भागवावी. 
         ४) एवढे शिकून घरात बसलीस तर शिक्षण फुकट जाते का ? 
         अजिबात नाही, शिक्षण वाघिणीचे दूध आहे. हुशार व्यक्ती कुठेही चमकू शकतात. 
          ५) स्त्रियांनी स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग समाज सक्षम करण्यासाठी कसा करता येईल असा विचार केला तर कितपत योग्य आहे? 
          पैसे कमवले तरच ज्ञानाचा उपयोग झाला असे नाही. गरजूला मदत, गरीब मुलांच्यासाठी शिकवणी, आपल्या कलेचा उपयोग करून त्यांची ट्युशन घेतले तरी समाज सक्षम होऊ शकतो
        ६) स्त्री जर हाउसवाइफ असेल तर दुय्यम स्थानी जास्त आणले जाते का? 
             स्त्री कमवती असली किंवा नसली तरी घरात दुय्यम स्थानच असते. तिने सर्वांचे सर्व करावे अशी घरातील मंडळींची अपेक्षा असते. पण ती सर्व करून आपले स्थान पक्के करते. एक दिवस बाहेरगावी गेली तर सगळे जाग्यावरच थांबते. 
          ७) आज काल नोकरीच्या नावाखाली मुली संसारात दुर्लक्ष करताना दिसतात...?
             बारा बारा तास नोकरी करून घर सांभाळणे कठीण, दमून जातात. घरच्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करतात. स्वतःपुरतेच विश्व मानतात. दुसऱ्याचे करायला वेळ नसतो. सासू, जावे कडून अपेक्षा करतात. माझ्या हातात जेवणाचे ताट आणून द्यावे.
         ८) मी कमावती आहे हा रुबाब दाखवून महिन्यात घटस्फोट घेतात चिंताजनक बाब आहे ना....? 
         मनापासून वाटते, ही चिंताजनक बाब आहे. त्यांना कुटुंब म्हणजे काय असते ? घरच्या लोकांना शब्दाने जपायचं असतं. नातेवाईक, प्रेमळ भावना कळत नाही; कळतो तर फक्त पैसा. नवऱ्याला, घरच्यांना किंमत नाही. मी म्हणते ती पूर्व दिशा. मीपणा वाढत चालला. आहे यावर कायदा व्हायला पाहिजे. 

      सौ. सुलोचना पाटील
            सांगली.
भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम विषय: मत प्रदर्शन,
हा एक भारतीय कोल्हापूर मंच आयोजित  मतप्रदर्शन उपक्रम असून सदर लिखाण हे लिहिणाऱ्या चे वैयक्तिक मत आहे, या मतांशी संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही.
            संपादक
     न्यूज मसाला, वृत्तसेवा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !