चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -२ Good luck चंद्रयान 3
चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !!
कविता -२
Good luck चंद्रयान 3
पृथ्वीची ओसंडून वेस
पाहिलास तू नवा देश !
प्रियकर, मामा इथे ख्याती
डोलला अभिमानाचा शेष !!
देव म्हणून तुज पूजले
ओव्या, आरतीत भजले !
नव्या युगाचे पाऊल नवे
देशाचे कौतुक झाले !!
इस्त्रो शास्त्रज्ञ कथा न्यारी
छातीठोक अभिमान वारी !
पहिला वाहिला भारत देश
फडकवल्या तिरंगा लहरी !!
आनंदाचे दरवळले अत्तर
डोंगर, दरी, कातळ, पत्थर !
दुमदुमली चंद्रयान 3 पांढरी
सफल, यशस्वी इस्त्रोचा पत्कर !!
कल्पना मापूसकर,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा