पंडित कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान !

पंडित कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,
7387333801
        उस्मानाबाद : लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मचरित्र, संपादित साहित्य व आंबेडकरी साहित्य या प्रकारात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्य प्रकारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिला जातो. त्यातील आंबेडकरी साहित्य या प्रकारात पंडित कांबळे यांच्या "उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरवादी साहित्यिक" या पुस्तकास २०२२ सालचा तृतीय राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार मिळाला.

दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी भालचंद्र ब्लड बँक, लातूर येथे पंधरावा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी पंडित कांबळे व लीना कांबळे यांचा ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद शोभणे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सपत्निक डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व अकादमीचे अध्यक्ष ऍड.एस. एन. बोडके, प्रमुख पाहुणे उदगिरी महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माननीय अविनाश देवशेटवार, शोभनेताई, संस्थेचे सदस्य सचिव प्रकाश घादगीने  कार्याध्यक्ष प्रा. श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर, अंगद गायकवाड, वामन कांबळे, कुसुमताई बोडके, नागनाथ कलवले यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सभागृहात डॉ. ऋषिकेश कांबळे, राजन लाखे व अनेक नामवंत साहित्यिकांसह त्यांचे नातेवाईक, मित्र, परिवार यावेळी उपस्थित होते.
     पंडित कांबळे हे नगरपरिषद शाळा क्रमांक १४ उस्मानाबाद येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे तीन कवितासंग्रह, तीन बालकविता संग्रह, तीन संपादने व एक समिक्षेचे पुस्तक अशी दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पंडित कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे साहित्यिक, मित्र, नातेवाईक यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे