तहसीलदारास पंधरा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !



तहसीलदारास पंधरा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
         नासिक::-  तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम, यांस १५ लाखांची लाच मागितल्यावर करणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

        राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,  स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत आलोसे यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते आरोपी लोकसेवक यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज दिनांक ०५/०८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
          सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, सहसापळा अधिकारी स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. गणेश निबाळकर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे