मेकॅनिकल इंजिनिअर मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा आनंदचा मुख्य नायिकेच्या भूमिकेतील 'सिर्फ मनी' हिंदी चित्रपट उद्या चित्रपटगृहात दाखल !

मेकॅनिकल इंजिनिअर मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा आनंदचा मुख्य नायिकेच्या भूमिकेतील 'सिर्फ मनी' हिंदी चित्रपट उद्या चित्रपटगृहात दाखल !

अपूर्व आनंद ने नाशिकच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा !

'सिर्फ मनी' हिंदी चित्रपटात केली मुख्य नायिकेची भूमिका

       नाशिक(प्रतिनिधी):- नाशिकचा कला साहित्य क्षेत्रातील वारसा जपत आजवर अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत नाव केल आहे. असाच काहीसा प्रयत्न करत शहरातील उदयोन्मुख अभिनेत्री म्हणून अपूर्वा आनंद ह्या मराठमोळ्या मुलीने 'सिर्फ मनी' ह्या हिंदी चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका करत नाशिक शहराचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. 'सिर्फ मनी' हा चित्रपट उद्या ४ ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात दाखल होत आहे. 


          पंजाब अमृतसर येथे वास्तव्यास राहणारी रंगीली नावाची तरुणी जी एका सर्वसामान्य घरातील मात्र सर्व गुण संपन्न असणारी मुलगी. बालपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड असते. एक चांगली अभिनेत्री व्हावी हे स्वप्न तिच्या आईचे आणि तीचे देखील असते. याच अनुषंगाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी रंगीली अमृतसर पंजाब येथून मुंबईत दाखल होते. मला सर्व काही येते असा समज असणाऱ्या रंगीलीला मात्र मुंबईत दाखल झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात एक स्थान मिळविण्यासाठी किंवा एखादे काम मिळवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्या अडचणींचा सामना करत ही आपली ध्येयापर्यंत कसे पोहोचते हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. तिचा हाच प्रवास 'सिर्फ मनी' या चित्रपटात आपणास बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून रंगीलीची भूमिका नाशिक शहरातील मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा आनंद हिने अतिशय उत्कृष्ट अभिनय करत आलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. या चित्रपटाचे निर्माते सत्यवान नाईक असून याचे दिग्दर्शन जितेंद्र कीर यांनी केलेय तर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अपूर्वा आनंद सह सुदेश बेरी, सुरज भारद्वाज यांसह अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका निभावल्या आहेत. चार ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात दाखल होणाऱ्या या चित्रपटाविषयी आणि नाशिक शहरातून हिंदी चित्रपटाच्या मुख्य नायिकेपर्यंतचा प्रवास नाशिक येथील पत्रकार परिषदेत अपूर्वा आनंद (खरे) हीने सांगितला. उच्च शिक्षित असलेल्या अपूर्वा आनंदने आजवर मॉडलिंग तसेच मिस नाशिक २०१९ त्याचप्रमाणे मिस महाराष्ट्र २०२१ तर मिस इंडिया प्राईड २०१९ असे किताब पटकाविले आहेत.

त्याचबरोबर मोरया चाले परदेस या अल्बम सॉंग साठी तिने आपली कलाकृती सादर केली असून भविष्यातही उच्च शिक्षणाबरोबरच अभिनय क्षेत्रात ठसा उमटविण्याचा तिचा मानस असल्याचे तिने सांगितले. या सर्व प्रवासात तिच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांनी तिला मोलाची साथ दिली असल्याचे तिने आवर्जून सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे