ज्योतिषाच्या पुस्तक लेखनाबद्दलॲड. मिलिंद चिंधडे यांचा सन्मान !

ज्योतिषाच्या पुस्तक लेखनाबद्दल
ॲड. मिलिंद चिंधडे यांचा सन्मान !

        सातारा-नासिक::- ज्येष्ठ रमलतज्ञ आणि ग्रहांकितकार  चंद्रकांत शेवाळे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित ४१ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन झाले त्यामध्ये पुस्तक लेखनाबद्दल मिलिंद चिंधडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

          सत्काराला उत्तर देताना "ज्योतिष नभातील तारे" हे एक ज्योतिष विषयातील आगळे वेगळे पुस्तक असल्याचे नमूद करून त्यामध्ये ५० ज्योतिषांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याचे मिलिंद चिंधडे म्हणाले.
         

भालचंद्र ज्योतिष विद्यालय पुणे आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमी सातारा यांच्यातर्फे आयोजित या अधिवेशनात तीसहून अधिक ज्योतीष संस्थांचे प्रतिनिधी आणि देशातील सुमारे १००० हून अधिक ज्योतिर्वीद सहभागी झाले होते.
         अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध टॅरो ग्रंथ लेखिका ॲड. सुनिता पागे यांनी आणि स्वागताध्यक्षपद वास्तु ज्योतिषी ॲड. वैशाली अत्रे यांनी भूषविले. याप्रसंगी चंद्रकांत शेवाळे, सौ. पुष्पलता शेवाळे, राजेश वशिष्ठ, दिलीप अवस्थी, उल्हास पाटकर, प्रदीप पंडित, आप्पासाहेब नवले  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हेमचंद्र दाते यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !