सरकारी कर्मचाऱ्यावर धुम्रपान प्रतिबंधक कायद्यानुसार दंडात्मक कारवाई !
सरकारी कर्मचाऱ्यावर धुम्रपान प्रतिबंधक कायद्यानुसार दंडात्मक कारवाई !
नासिक(प्रतिनिधी)::- जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांचेकडून आरोग्य सहाय्यकावर धुम्रपान प्रतिबंधक कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नासिक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे, ता. दिंडोरी येथे भेट दिली असता आरोग्य सहाय्यक हे गुटखा खाल्लेले आढळल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासननिर्णय क्रमांक तंनिका-२१२३/प्र.क्र.८१/आरोग्य - ५ मुंबई दिनांक १०/०७/२०२३ अन्वये सार्वजनिक ठिकाणी शासकिय कार्यालये येथे नागरिकांच्या संरक्षणाकरिता सिगारेट, तंबाखू व तंबाखुजन्य इतर उप्तादने प्रतिबंधात्मक कायदा २००३ च्या कलम ४ अन्वये तंबाखु खाणे / थुंकणे / धुम्रपान करण्यास प्रतिबंध असल्याने शासकिय इमारतीच्या परिसरामध्ये धुम्रपान आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा असल्याने रक्कम रु. २००/- इतका दंड आकारणे बाबत सुचित केले त्याअनुषंगाने आरोग्य सहाय्यक यांचेकडुन सदरची दंडाची रक्कम वसुल करण्यात आलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा