आचार्य अत्रे आणि समकालिन यांच्याविषयी नवी पिढीने वाचन करावे – भाऊ तोरसेकर, आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीनी वरळीत अभिवादन !
आचार्य अत्रे आणि समकालिन यांच्याविषयी नवी पिढीने वाचन करावे – भाऊ तोरसेकर
आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीनी वरळीत अभिवादन !
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक
7387333801
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)::- आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई यांच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीदिनी वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी भाऊ तोरसेकर, आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, विसुभाऊ बापट, अरविंद भोसले, शिबानी जोशी, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, संतोष (आबा) माळकर, अशोक शिंदे, ह. मो. मराठे यांच्या कन्या श्रीमती पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिला जाणारा १३ वा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना समितीच्या वतीने आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी जाहीर केला. त्याचे वितरण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शानदार समारंभात होणार आहे.
आचार्य अत्रे यांचे ज्यांच्याशी वाद झाले, मैत्री झाली, अशा समकालिनांचे साहित्य नव्या पिढीने आवर्जून वाचले पाहिजे, अत्रे यांनी माणसं घडविली. मराठामध्ये शिपायापासून कंपोझिटर्सपर्यंत प्रत्येकाला बातमीची जाण होती, आजही ५० वर्षांच्या पत्रकारितेनंतरही आपण मराठातून आलो, अशी ओळख करून देताना आपल्याला अभिमान वाटते, असे विचार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, आज नवे अत्रे निर्माण होण्याची गरज आहे, जेणेकरून इतिहास निर्माण करणाऱ्या व्यक्ती इतिहासातील व्यक्तींनाही मोठ्या करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा