लाच स्वीकारताना लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
लाच स्वीकारताना लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक/जळगाव::- चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी त्यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी लिपिक दीपक जोंधळे याने २५९० /- रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली आहे. आलोसे यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथक पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा