वृक्ष उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात ! ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होणार वृक्ष उत्सव !!

नाशिक::- महानगरपालिका व हिरवांकुर यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच वृक्ष उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी या उत्सवा बाबत मनपा आयुक्त यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. नाशिक महानगरपालिकेचे भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृह येथे दि. ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
या प्रदर्शनात देशी प्रजातीची झाडे, रोपे यांची माहिती देण्यात येणार आहे. दिनांक ४ ऑगस्ट रोजी नाशिक मनपाचे शालेय विद्यार्थी व शिक्षक वृक्ष दिंडीत सहभागी होणार आहेत.
या दिंडीचे आयोजन मनपा शिक्षण विभागाने केले आहे. वृक्ष दिंडी रचना विद्यालय ते मुंबई नाका -दादासाहेब गायकवाड सभागृह या मार्गाने येऊन समारोप होणार आहे
तर नाशिक शहरातील सायकलिस्ट यांच्या वतीने राजीव गांधी भवन येथून सकाळी ७ वाजता मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
या वृक्ष उत्सव सायकल रॅलीत वृक्ष उत्सवाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. हिरवांकुर संस्थे मार्फत सकाळी दादासाहेब फाळके स्मारक पाथर्डी फाटा येथून पायी मशाल रॅली काढण्यात येणार आहे.
रॅली दरम्यान देशी झाडे व रोपे यांचा प्रचार प्रसार रॅलीत सहभागी पर्यावरण प्रेमी करणार आहेत. वृक्ष संवर्धनाबाबत विविध संदेश देण्यात येणार आहेत. या वृक्ष उत्सवात विविध प्रकारचे स्टॉल थाटण्यात येणार असून महिला बचत गट व सामाजिक संस्थाचा सहभाग असणार आहे.
नाशिक शहरातील सर्व नागरिकांनी वृक्ष उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे. बैठकीस उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, उपायुक्त श्रीकांत पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील घनकचरा व्यवस्थापक कल्पना कुटे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, मिळकत विभागाचे व्यवस्थापक जयवंत राऊत आदी अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा