जिल्ह्यातील १३८८ वी ग्रामपंचायत स्थापन !

जिल्ह्यातील १३८८ वी ग्रामपंचायत स्थापन !

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीमधून गोधड्याचा पाडा ही नविन ग्रामपंचायत स्थापना

         नाशिक - ग्राम विकास विभागाच्या शासन अधिसुचना दि. ३० जून २०२३ अन्वये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायतीमधुन गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८४ ऐवजी ८५ व नाशिक जिल्हा परिषदेमध्ये १३८७ ऐवजी १३८८ ग्रामपंचायती झाल्या आहेत. सदर ग्रामपंचायत स्थापन होणेबाबत सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य व इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे स्थानिक राजकारणी यांची मागणी व पाठपुरावा चालु होता.

          ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दि. १२ फेब्रुवारी २००४ व शासन परिपत्रक दि. ०२ सप्टेंबर २००६ नुसार तसेच वाघेरे येथील ग्रामसभा दि. २६ नोव्हें. २०२१ नुसार वाघेरा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन गोधड्याचा पाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत ठराव करण्यात आला होता व याबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांचेकडुन शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषद, स्थायी समिती दि. १२ सप्टेंबर २०२२ नुसार स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर सदर प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांना सादर करण्यात आला, मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचेमार्फत शिफारशीने प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. राज्य शासनाच्या दि. ३० जून २०२३ रोजीच्या शासन अधिसुचनेद्वारे गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकुण ८५ ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे स्वतंत्र कार्यकारिणी, ग्रामपंचायत कार्यालय, १५ वा वित्त आयोग व पेसा निधी स्वतंत्रपणे मिळणार आहे. सदर नविन ग्रामपंचायत स्थापनेमध्ये वाघेरे गोधड्याचा पाडा यांच्या कार्यकारिणी, मत्ता व दायित्व तसेच इतर कामकाज याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहे.


         त्याचप्रमाणे यावर्षी नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळुंगी या ग्रामपंचायतीमधुन सुभाषनगर, बागलाण तालुक्यातील केळझर या ग्रामपंचायतीमधुन तताणी, व येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी या ग्रामपंचायतीमधुन लौकी शिरस अशा तीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी दिली.
*************************************
"त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीमधुन गोधड्याचा पाडा हि स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यामुळे गोधड्याचा पाडा या गावाला शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे आता शक्य होणार आहे व ही ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या १३८८ इतकी झाली आहे."
- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !