तक्रारदाराच्या घरी जाऊन लाच मागितली, पोलिस ठाण्यात महिला तलाठीसह तिघांवर गुन्हा दाखल !

तक्रारदाराच्या घरी जाऊन लाच मागितली, पोलिस ठाण्यात महिला तलाठीसह तिघांवर गुन्हा दाखल !

     नासिक::- साक्री तालुक्यातील रोजगांव येथील तलाठी श्रीमती ज्योती के. पवार, (वर्ग-3) सध्या नेमणूक-मंडळ अधिकारी, तामथरे मंडळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे, तसेच संगणक आॅपरेटर योगेश कैलास सावडे, व कोतवाल छोटू जाधव यांनी तक्रारदाराच्या घरी लाचेची रक्कम घेण्याकरिता गेले व पंच साक्षीदारांसमोर पुन्हा मागणी केल्याने सदर तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          तक्रारदार यांचे वडिलांचे व भावाचे नावाने रोजगाव ता.साक्री जि.धुळे येथील शिवारात सर्वे क्र.155/62 व 155/63 या शेतीचे खातेफोड करून तीन्ही भावांचे नावाने सातबारा तयार करून देण्याचे मोबदल्यात एकूण ४००००/- रू. लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांचेकडून १००००/- व मार्च-२०२३ मध्ये तक्रारदार यांचे वडिलांकडून १००००/- असे एकूण २००००/- रूपये काम करून देण्याचे मोबदल्यात अगोदरच घेतले.
      त्यानंतर दि. १८ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नंदुरबार कार्यालयात तक्रार दिलेनंतर पंच साक्षीदारासमक्ष पडताळणी केली असता आलोसे तलाठी श्रीमती ज्योती पवार यांनी खातेफोड करून देण्याचे मोबदल्यात उर्वरित २००००/- रू. ची मागणी करून तडजोडीअंती १५०००/- रू. लाचेची मागणी केली. त्यानंतर त्याच दिवशी तक्रारदार हे  श्रीमती पवार यांना लाचेची रक्कम देण्यास गेले असता त्या मिळून आल्या नाहीत, परंतू नमूद कार्यालयातील संगणक ऑपरेटर योगेश सावळे यांनी तक्रारदार यांना पैसे आणलेत का? विचारून लाचेची मागणी केली तसेच दि. २९ मे  रोजी सापळा कार्यवाही दरम्यान यातील आरोपी योगेश सावळे व आरोपी छोटू जाधव (कोतवाल, सजा-जैताणे) यांनी आरोपी श्रीमती ज्योती पवार यांनी सांगितलेवरून जैताणे येथील तक्रारदार यांचे राहते घरी लाचेची रक्कम घेण्याकरीता जावून पुन्हा पंच साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी केली, म्हणून त्यांचेविरूद्ध निजामपूर पोलीस स्टेशन, ता.साक्री, जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
              पर्यवेक्षण अधिकारी राकेश आ. चौधरी, पो. उपअधीक्षक, सापळा अधिकारी समाधान महादू वाघ, पोलिस निरीक्षक, सह सापळा अधिकारी श्रीमती माधवी एस वाघ, सापळा कार्यवाही पथक पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/ज्योती पाटील, पोना/मनोज अहिरे, पोना/देवराम गावित, पोना/संदीप नावाडेकर व पोना/अमोल मराठे यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !