डॉ. शंकर अंदानी यांचा कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव ! दिड हजार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्वाचा सत्कार !! Dr. Shankar Andani is honored with the Agricultural Inspiration Jeevan Gaurav Award !
डॉ.शंकर अंदानी यांचा कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव !
दिड हजार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्वाचा सत्कार !!
नासिक::- ॲग्रोकेअर कृषिमंच व कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनी लि. नाशिक प्रस्तुत कृषि दिन व ॲग्रोकेअर कृषिमंच च्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी AGRIBIZ CONNECT 2023- हा १६ वा वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार २०२३ वितरण सोहळा नाशिक येथे उद्घाटक आम. नितीन पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य व धान्य वाटप, ११ शेतकरी उत्पादक कंपनीचे लोगो अनावरण, AGROBIZ APP चे लॉंचींग यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, प्रमुख पाहुणे दिपक शिर्के (सुप्रसिद्ध अभिनेता मुंबई ), प्रमोद रसाळ, जितेंद्र शहा, राजेंद्र देवरे, भूषण परशराम निकम उपस्थित होते. या सोहोळ्याच्या आयोजक अॅग्रोकेअर कृषीमंचच्या संचालक रोहिणी पाटील होत्या. नाशिक येथील हॉटेल पंचवटी प्राईड येथे हा सोहोळा उत्साहात संपन्न झाला. डॉ.अंदानी यांच्या कार्याचा आज विशेष गौरव करण्यात आला. त्यांचे कृषि क्षेत्रामधील कार्याचा हा सन्मान करण्यात आला.
अहमदनगर येथील सनदी लेखपाल (सीए) शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी ३६४ धार्मिक स्थळांमध्ये सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल या रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकृत संकेत स्थळावर त्यांच्या कामाची नोंद जाहीर करण्यात आली आहे.
शंकर अंदानी मागील अनेक वर्षापासून समाजकार्य करीत आहे. त्यांनी मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टचे काम सेवाभावाने केले. या रेकॉर्डासाठी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कार्य व विक्रम करणारे अत्यंत मोजके व ठराविक व्यक्तींना संधी दिली जाते. यासाठी त्यांच्या कार्याची पूर्णत: छाननी व तपासणी करून विक्रम यादीत नोंद करण्यात येत असते. अंदानी यांच्या रुपाने सामाजिक कार्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले ते पहिले व्यक्ती ठरले आहे.
सीए शंकर अंदानी यांना काही महिन्यांपूर्वी युनायटेड नेशन, अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मेडल ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ट सेवा कार्याचा) सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अंदानी यांना जवळपास दीड हजार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ते शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व अहमदनगर महानगरपालिकेचे मागील अनेक वर्षांपासून कर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अनेक शासकीय संस्था व बँकचे ते लेखापरीक्षक व कर सल्लागार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा