तलाठ्यासह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
तलाठ्यासह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक::- त्र्यंबकेश्वर येथील तलाठी संतोष शशिकांत जोशी, कोतवाल रतन सोनाजी भालेराव कोतवाल यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांनी जमीन खरेदी केली असून त्यांची सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात वरील दोन्ही आलोसे यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम दोन हजार रुपये आलोसे क्रमांक एक यांनी तलाठी कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे पंच साक्षीदारास समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, सापळा पथक पो. ना. प्रवीण महाजन, पो. ना. नितीन कराड, पो. ना. प्रमोद चव्हाणके
चालक पोहवा संतोष गांगुर्डे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा