बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने खासदार गोडसेंचा सत्कार !

बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने खासदार गोडसेंचा सत्कार !

          नासिक::- नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक लि.नासिक च्या झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने एकवीस-शून्य असे घवघवीत यश संपादन केले. या यशाचे श्रेय विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना देत त्यांचा सत्कार करण्यात आला.

      सत्कार प्रसंगी चर्चा करताना संचालकांनी बॅंकेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून उत्पन्नाच्या स्रोतावर कर वजावट केली जाते तर त्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्याच ठेवींवर मिळत असलेल्या व्याजावर पुन्हा कर कपात होते. ती होऊ नये यासाठी खासदार गोडसे यांनी प्रयत्न करावेत असे साकडे घालण्यात आले. 
      गोडसेंच्या सत्कार प्रसंगी पॅनेलच्या वतीने नवनिर्वाचित सदस्य प्रमोद निरगुडे, रविंद्र आंधळे, बाळासाहेब ठाकरेपाटील, विक्रम पिंगळे, अजित आव्हाड, विजय देवरे आदी उपस्थित होते.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !