रविवारी मोहम्मद रफींच्या स्मृतीदिनी तेरी आँखो के सीवा... संगीत मैफल

रविवारी मोहम्मद रफींच्या स्मृतीदिनी
 तेरी आँखो के सीवा... संगीत मैफल 

       नाशिक ( प्रतिनिधी )::-लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांची रविवारी (दि. ३०) ४३ वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त सूर शारदा म्युझिकल फाउंडेशनतर्फे गायक घनश्याम पटेल यांनी 'तेरी आँखो के सीवा' या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता ही विनामूल्य मैफल होईल.

         मोहम्मद रफींनी हजारो सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांना बहाल केला आहे. त्यातील निवडक गाणी प्रमुख गायक घनश्याम पटेल यांच्यासह संजय डेरे, प्रकाश रत्नाकर, मनोहर देवरे, अमित गुरव सादर करणार आहेत. त्यांना गायिका स्मिता पांडे, उर्मिला शिंदे, नीता पवार स्वरसाथ करतील. संगीत संयोजन गायक नंदकुमार देशपांडे यांचे आहे.

संगीतसाथ अमोल पाळेकर व सहकारी करतील. पवन वंजारी तांत्रिक बाजू सांभाळणार असून उस्मान पटणी‌ 
निवेदनाद्वारे रफींच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेतील. सर्व रसिकांनी उपस्थित राहून सुवर्णमयी काळातील सुमधूर गाण्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !