संशयास्पद लाखो रुपयांचा निम कोटेड युरीया पकडला, संशयितासह दोघांवर गुन्हा दाखल !

संशयास्पद लाखो रुपयांचा निम कोटेड युरीया पकडला, संशयितासह दोघांवर गुन्हा दाखल !
          नासिक::- स्थानिक गुन्हे अन्वेषण नाशिक शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रुद्राय हाॅटेल, निफाड येथे ट्रक क्रमांक एम. एच. १८ बी. एच. १७८६ मध्ये रक्कम रुपये ३५ लाख मुल्य असलेले संशयास्पद निम कोटेड युरीयाच्या ५० कि. ग्रॅ. च्या ४९३ गोण्या, निमकोटेड युरीयाच्या ४५ कि. ग्रॅमच्या ९ गोण्या, स्टीचींंग मशिन, चंबल फर्टीलायझस, कृभको व झुआरी या ५२९ रिकाम्या गोण्या, ट्रक असा मुद्देमाल जप्त करून निफाड पोलिस स्टेशन येथे जगन सुर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी संशयीत व इतर २  विरोधात खत नियंत्रण आदेश १९८५,  जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ व भादंवि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

         निफाड पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये मोहन वाघ सर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक व शहाजी उमप, पोलिस अधीक्षक, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जगन सुर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी सागर कोते, सहायक पोलिस निरीक्षक, नितेंद्र पानपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग व बाळासाहेब खेडकर, कृषी अधिकारी पंचायत समिती निफाड यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.


       यावेळी कैलास शिरसाठ, कृषी विकास अधिकारी जि. प. नाशिक, संजय सुर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी निफाड, संजय शेवाळे, तंत्र अधिकारी, अभिजीत जमधडे, मोहीम अधिकारी जि. प. नाशिक, पवार , तालुका कृषी अधिकारी निफाड उपस्थित होते.
कृषी सहायक शेजवळ व सोमवंशी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
          संशयीताने शेतीसाठी वापर केला जाणारा निमकोटेड युरीया औद्योगिक वापरासाठी शेलार कृषी सेवा केंद्र, लासूर, जि. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथून आणल्या होत्या. तंत्र अधिकारी (गुनि) औरंगाबाद याबाबत पुढील कार्यवाही करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !