३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

         मुंबई -नासिक::- “३५० वा शिवराज्याशिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचे पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धित शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा वापर करण्याचा शासन निर्णय राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात आला.

          बोधचिन्हाचा सर्व शासकीय पत्रव्यवहारात, प्रचार- प्रसिद्धित कटाक्षाने वापर करण्यात यावा. शासकीय कार्यालयात दर्शनी भागात बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे अशा सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !