स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन प्रेरणादायी-नीलिमाताई पवार
स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन प्रेरणादायी-नीलिमाताई पवार
नाशिक ( प्रतिनिधी )::- करणने आपल्या कलेचा छंद जिवंत ठेवला. त्याने सातत्याने चित्रे रंगवून चित्रकलेत प्राविण्य मिळवले. त्याच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनात याचा प्रत्यय येतो. त्याचा हा प्रयत्न इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी केले. स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शनाच्या उदघाट्नप्रसंगी त्या बोलत होत्या.
चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता करण धोंडगे या युवकाने स्वयंप्रेरणेने कलासाधाना सुरु ठेवली. कृषी अभ्यासक्रम शिकताना तो आपला छंद जपतो आहे. त्याचे पहिलेच 'स्वयंप्रेरणा' हे चित्रप्रदर्शन नाशिकरोडच्या पीएनजी कलादालनात भरविण्यात आले आहे. करण विलास धोंडगे सध्या नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषीमहाविद्यालयात बीएससी ऍग्रीकल्चरच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. तो सातत्याने चित्रे रंगविण्यात रमून जातो.
त्याचे स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन नाशिकरोडला पासपोर्ट ऑफिस शेजारी पु.ना. गाडगीळ कलादालनात दि. ३० जुलै पर्यंत दररोज सुरु राहील. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत दररोज कलारसिकांना विनामूल्य बघता येईल. गणपती, कृष्ण यासह वेगवेगळे विषय त्याने रेखाटले असून आकर्षक रंगसंगतीत रंगवले आहेत. जास्तीतजास्त रसिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन करणला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा