जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेच्या निवडणूक वचननाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार- नवनिर्वचित चेअरमन बाळासाहेब ठाकरे यांची घाेषणा !

जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेच्या निवडणूक वचननाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार- नवनिर्वचित चेअरमन बाळासाहेब ठाकरे यांची घाेषणा !
 
    नासिक( प्रतिनिधी)::- नाशिक 
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या सभासदांनी सहकार पॅनेलला २१-० अशी आघाडी देत निवडणूकीतील वचननाम्यावर जो विश्वास व्यक्त केला तो १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे. बॅंकेच्या व सभासदांच्या हितासाठी आम्ही सर्व समविचारी असून नवनिर्वाचित संचालकांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब ठाकरे -पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

         सभासदांच्या मुलींसाठी बॅंकेमार्फत ‘सुकन्या विवाह याेजना’ हाती घेण्यात आली असून मसूदा तयार करण्यात येत आहे. या याेजनेंतर्गत सभासद कन्येच्या विवाहानिमित्त ११ हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. 
             जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या निवडणूकीनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. सभासदांनी जाे विश्वास  दाखवला त्यास कधीही तडा जाऊ दिला जाणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा व ठेवींवर जादा व्याजदर देण्याचाही आमचा मानस आहे. बॅंकेच्या व सभासदांच्या भल्यासाठी वर्गणीची रक्कम वाढवून भागभांडवलात वाढ करण्यात येणार असून याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
       अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड कोअर कमिटी च्या नव्हे तर सन्माननीय जेष्ठ  मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे केली असली तरी त्यांनी सदर निर्णय आमच्यावर लादलेला नव्हता असे संचालक मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आम्ही सर्व एकदिलाने काम करावे, सभासदांचं हित जपावे व आम्हाला पुर्वानुभावाचं मार्गदर्शन लाभावे यासाठी जेष्ठ, तज्ञ मार्गदर्शक आहेत, कोणतीही कोअर कमिटी नाही. राजकारणासाठी नव्हे तर बॅंकेच्या हितासाठी मार्गदर्शकांचा सल्ला वेळोवेळी घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सेवा निवृत्त सभासदांना मतदानाचा हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे संचालक रवींद्र आंधळे यांनी सांगितले. बॅंकेचे उपाध्यक्ष अमाेल मुळे यांनी आभार मानले. पत्रकार परिषदेस संचालक प्रमाेद निरगुडे, विजय देवरे, अजित आव्हाड, विक्रम पिंगळे, नीलेश देशमुख, माेहन गांगुर्डे, जयंत शिंदे, रमेश बाेडके, अभिजित घाेडेराव, सचिन विंचूरकर, विनाेद जवागे उपस्थित हाेते. 
************************************
   एक रूपयाही भत्ता घेणार नाही- देवरे 
            आजपर्यंत बॅंकेचा प्रशासकीय खर्च माेठ्या प्रमाणात करण्यात होत आला आहे असे सकृतदर्शनी वाटते. मुळात हा सभासदांचा पैसा असल्याने बॅंकेचा प्रशासकीय खर्च वाचविण्यासाठी आपण एक रूपयाही भत्ता घेणार नसल्याचे नवनिर्वाचित संचालक विजय देवरे यांनी यावेळी जाहीर केले.
*************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !