"श्री साखर व श्री मोदक महानैवेद्य" अर्पण सोहळा !!


"श्री साखर व श्री मोदक महानैवेद्य" अर्पण सोहळा !!
   
      नासिक (प्रतिनिधी)::- नासिक महानगर क्षेत्रातील श्री गजानन महाराजांचे भक्त मंडळे व संस्थेच्या वतीने सोमवार दि. २४ जुलै २०२३ रोजी श्री क्षेत्र शेगांव येथे साखर व मोदक महानैवेद्य अर्पण सोहळा संपन्न होणार आहे.  
      या पूर्वी ६ ऑगस्ट २०१९ साली नाशिक महानगर क्षेत्रातील सर्व भक्तांनी मिळून सुमारे साडेतीन लाख मोदकाचा महानैवेद्य अर्पण सोहळा शेगांव येथून पंढरपूर येथे जाणारी व परत येणारी पायदळवारीच्या वेळी श्री मोदक व त्यानंतर २०२० मध्ये झुणका-भाकरी महानैवेद्य अर्पण सोहळा संपन्न झाला होता.  


           साखरेबरोबरच मोदक महानैवेद्यही अर्पण करण्याचा संकल्प केलेला असून प्रत्येक भक्ताने किमान २१ मोदक, भक्तांनी संपुर्ण नांव व मो. नंबर ची यादी दि. २१ जुलै २०२३ पावेतो द्वारा- रविंद्र जोशी, ३ वेरोनिका सोसायटी, माधव काॅलनी, जनरल वैद्य नगर पोस्ट ऑफिस समोर, पौर्णिमा स्टाॅप, नासिक, येथे जमा करावे असे आवाहन रविंद्र जोशी, मिलिंद नाईक, अमोल शेळके, सौ. सुजाता करजगीकर, सतीश वावीकर, सतीश करजगीकर, सुमती जोशी, सौ. भाग्यश्री नाईक, विजय उदगीरकर, संजीव रानडे, वसुंधरा कुलकर्णी, आनंदा शेळके, सौ. अनुराधा शेटे, प्रदीप पाटील, सौ. स्नेहा कुलकर्णी, रेखा देशमुख, रविंद्र डांगे, शांताराम कुलकर्णी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी