लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !


लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !
        
      संभाजीनगर (प्रतिनिधी)::- प्रसिद्ध लेखक कै. सुहास शिरवळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित कादंबरी लेखन स्पर्धेत लेखक रवींद्र भयवाल लिखित "मिशन गोल्डन कॅट्स" या कादंबरीची निवड परीक्षकांनी 'विजेती कादंबरी' म्हणून केली आहे. या कादंबरी लेखन स्पर्धेत एकूण एकवीस लेखक सहभागी झाले होते.

रवींद्र भयवाल यांच्या या यशामुळे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
               रवींद्र भयवाल यांची आतापर्यंत साहित्यातील विविध प्रकारात एकूण सहा पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
           रवींद्र भयवाल हे छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांचे सुपुत्र असून चेन्नई येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत विभागप्रमुख आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !