श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ची सामाजिक बांधिलकीतून अंध पालक पाल्यांना सालाबादप्रमाणे यंदाही मदतीचा हात ! डॉ. हेलन केलर यांची १४९ वी जयंती साजरी करण्यात आली
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ची सामाजिक बांधिलकीतून अंध पालक पाल्यांना सालाबादप्रमाणे यंदाही मदतीचा हात !
डॉ. हेलन केलर यांची १४९ वी जयंती साजरी करण्यात आली
नासिक::- ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड डिसेबंल्ड आणि श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने श्री साईबाबा हार्ट इनस्टिटूट या ठिकाणी गरजू
अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्य नोटबुक, कंपास , बॉटल, दप्तर, आदि वस्तूचे प्रमुख पाहुण्यांच हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर लेखिका सौ. विजयालक्ष्मी वैरागकर, ( मनेरीकर ) तसेच उद्योजिका मेघा गुप्ता, नाशिक बाजार समितीचे उपसभापती उत्तम खांडबहाले, MSL Driveline Systems Limited चे जनरल मॅनेजर हेमंत राग उपस्थित होते.
प्रारंभी सर्व अतिथिंनी आदरणीय डॉ. हेलन केलर यांच्या प्रतीमेचे पुजन करून अभिवादन केले. औपचारीक स्वागत करून पाहूण्यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. या वेळी आपले विचार व्यक्त करताना सौ. वैरागकर यांनी संस्थेंच्या कार्याचे कौतुक करून या संस्थे सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून आपण या संस्थेत जोडण्यासाठी उशीर केला ही खंत बोलून दाखवली. त्यानंतर मेघा गुप्ता यांनी आपले भाषण करताना मी गेल्या दहा वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने संस्थेस मदत करत असल्याचे सांगितले, खांडबहाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संर्वांना एकादशीच्या शुभेच्या दिल्या व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व कंपनी तर्फे सालाबादप्रमाणे धनादेश दिला. या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. डॉ. पल्लवी अनिरुद्ध धर्माधिकारी, वरुण कौशिक, रितेश वैश, रमेश फड, जैस्वाल, पुंजा हडपे, विद्या जगताप आदि उपस्थित होते
संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी पाहुण्यांचे आभार मानले डॉ. पल्लवी धर्माधिकारी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना, पुढेही या प्रकारे उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली. अध्यक्ष विकास शेजवळ यांनी संस्थेचा परिचय करून दिला. महाले सरांन मान्यवरांचे परिचय करून दिले, रामदास जगताप यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमात ९५ अंध पालकांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रसंगी श्री साईबाबा हॉस्पिटच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा