आषाढी स्पेशल (१५), सौ. निर्मला भयवाळ, "धुंद होऊनी नाचतो वाळवंटी, आम्ही वारकरी" !
आषाढी स्पेशल (१५), सौ. निर्मला भयवाळ, "धुंद होऊनी नाचतो वाळवंटी, आम्ही वारकरी" !
आम्ही वारकरी, वारकरी
करितो पंढरीची वारी !
हाती टाळ मृदुंग
मुखी विठ्ठलाचे नाव
आम्ही वारकरी !
गात विठ्ठलाची गाणी
क्रमितो वाट पंढरीची
आम्ही वारकरी !
खेळतो आम्ही जागोजागी
फुगड्या, पावली आनंदाने
आम्ही वारकरी !
जमतो सारे वाळवंटी
घेउनी झेंडे, पताका हाती
आम्ही वारकरी !
मुखी विठ्ठल विठ्ठल गर्जत
धुंद होऊनी नाचतो वाळवंटी
आम्ही वारकरी !
__सौ. निर्मला भयवाळ
छत्रपती संभाजीनगर
खूप छान भक्तीमय कविता आहे.
उत्तर द्याहटवा