आषाढी स्पेशल, डॉ. अंजना भंडारी म्हणतात "अनाथांना घेऊनी कडेवर, स्वतः विठ्ठल बनून पहावे" !
!! आषाढ वारी !!
नेहमीच येते आषाढ वारी
जमून येतात काळे ढग !
विठ्ठलाच्या भेटी साठी
उतावीळ होतो प्रत्येक जन !!
तो घेतो टाळ मृदंग
ती गाते सुरेख अभंग !
दिंडी पताका खांद्यावरती
क्षणभराची नसे उसंत !!
भक्ती पूर्ण वारी होते
जीवाशीवाची भेट घडते !
रस्त्यामधुनी माणुसकीच्या
विठ्ठलाचे दर्शन घडते !!
पानोपानी झाडांवर
थेंब आडकतो असा !
काळ्या आईच्या कुशीत पडतो
टाळ वाजवावा जसा !!
काळ्या मातीतून अंकुर फुटतो
जणू विठ्ठल शेला पांघरतो !
कुठे दुरवर फुलतात फुले
शेत जणू पताका घेऊनिया डुले !!
सुख दुःखाला ठेवुनीया दूर
वारीत एकदा जाऊन पहावे !
अनाथांना घेऊनी कडेवर
स्वतः विठ्ठल बनून पहावे !!
__डॉ. अंजना भंडारी
नाशिक
VERY NICE 🙏 🙏
उत्तर द्याहटवा