आषाढी स्पेशल, आरती डिंगोरे यांची स्वरचित "थवा वैष्णवांचा नाचतसे " !
!! थवा वैष्णवांचा !!
घेऊनी पताका वैष्णव निघती,
जयांच्या संगती पांडुरंग...
पाऊले चालती वाट पंढरीची,
गाठ संसाराची सोडूनिया...
डोईवर शोभे तुळस ती छान,
ठेवी संतुलन निसर्गाचे...
टाळ विणा हाती भक्तीगीत गाती,
महिमा वर्णिती पंढरीचा...
अबीर गुलाल उधळती सारे,
भक्तिमय वारे चोहीकडे...
ब्रम्हांडी निनादे गजर हरीचा,
थवा वैष्णवांचा नाचतसे...
महिमा नामाचा सांगती सकला
भेटण्या विठ्ठला धाव घेती...
आषाढी कार्तिकी सोहळा विठूचा,
गजर नामाचा चालतसे...
वाळवंटी होई,काल्याचे किर्तन
धाव घेई मन घराकडे...
__आरती डिंगोरे.✍
सुंदर
उत्तर द्याहटवा